‘प्रवरा’च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
प्रवरानगर : येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरचा आणि दुसऱया वर्षाचा तिसऱ्या सेमिस्टरचा निकाल नुकताच जाहीर झाला. प्रवरा प्रशिक्षण संस्थेची उत्कृष्ट निकालाची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. ६६४ विद्यार्थ्यांपैकी ६०९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले अशी माहिती प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी दिली.
पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा ९५. ९८ टक्के तर, दुसऱया वर्षाचा तिसऱ्या सेमिस्टरचा निकाल ८५ टक्के इतका लागला. फिटर ट्रेड ९६.७२ टक्के, वेल्डर ९२.०५ टक्के, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅम असिस्टंट १०० टक्के, मशीन मोटार व्हेईकल ९८. ०३ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स ९५. २३ टक्के, दुसऱया वर्षाचा तिसऱ्या सेमिस्टरचा निकालामध्ये, डिझल मेकेनिक् १०० टक्के, रेफ्रिजरेशन अँड इअर-कांडिक्शन १०० टक्के, वायरमन ९५ टक्के, ड्राप्समन मॅकेनिक १०० टक्के, पेंटर ७७. टक्के, तर दुसऱया वर्षाचा तिसऱ्या सेमिस्टरचा फिटर ६६. १९ टक्के, मॅकेनिक मोटार व्हेईकल ९१.३७ टक्के, इलेक्ट्रिशियन ९८. २४ टक्के, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ९४. टक्के, रेफ्रिजरेशन अँड इअर-कांडिक्शन १०० टक्के, वायरमन ९४. ४४ टक्के, ड्राप्समान मॅकेनिक ९१. ६६ टक्के आणि पेंटर ट्रेंडचा निकाल ९१. टक्के इतका लागला.
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, ऍडिशनल सेक्रेटरी भारत घोगरे व संचालक हरिभाऊ आहेर आदींसह शिक्षकांनी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.