काबूलमध्ये आणखी हल्ले करू; तालिबानची धमकी
वृत्तसंस्था | काबूल
|
आम्ही राजधानी काबूलमध्ये आणखी हल्ले करणार आहोत, त्यामुळे 'लष्कराच्या केंद्रांजवळ' जाऊ नका, असा इशारा तालिबानने येथील नागरिकांना सोमवारी दिला. तालिबानने याआधीही असे इशारे नागरिकांना दिले होते, पण काबूलचा उल्लेख करून पहिल्यांदाच असा इशारा देण्यात आल्याचे मानले जात आहे. काबूल हे शहर नागरिकांसाठी सर्वात भयावह शहर ठरले आहे, अशी टिप्पणी संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच केली होती. त्यानंतर लगेचच तालिबानने हा इशारा दिला आहे. तालिबानने ऑनलाइन एक पत्रक जारी केले असून त्यात म्हटले आहे की, 'आम्ही उन्हाळ्यात दरवर्षी शत्रूवर हल्ले करतो. त्याचाच एक भाग म्हणून 'शत्रूच्या लष्करी आणि गोपनीय केंद्रांवर' आणखी हल्ले करण्याची योजना आखत आहोत. |