विधानपरिषद निवडणूक : भाजप-सेना दोन-दोन जागांवर विजयी ; काँग्रेसचा धुव्वा तर राष्ट्रवादीचा चमत्कार
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणार्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने 2 ठिकाणी तर शिवसेनेने 2 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. अमरावती विधानपरिषद मतदासंघातून भाजपचे प्रविण पोटे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून रामदास अंबटकर तर नाशिकमधून शिवसेनेनचे नरेंद्र दराडे हे विजयी झाले आहेत.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंनी बाजी मारली. तर परभणी-हिंगोली येथे शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. या निवडणूकीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, आणि परभणी- हिंगोली या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला आहे.
अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला, कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मते असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मते मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रविण पोटे यांनी 458 मते मिळवत मोठा विजय मिळवला. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विजय मिळवला. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार्या भाजपला हा मोठा दणका आहे. दराडे यांनी 412 मते मिळवत सहाणे यांचा पराभव केला. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी 620 मते मिळवत शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्याविप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मते मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मते पडली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणार्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 550 मते मिळाली.
विजयी उमेदवार
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - नरेंद्र दराडे (412 मते)
राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मते)
शिवसेनेचे नरेंद्र दराडे 193 मतांनी विजयी
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (620 मते)
शिवसेना - राजीव साबळे (306 मते)
राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे 314 मतांनी विजयी
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मते)
काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मते
शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांचा 35 मतांनी विजय
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजप - प्रविण पोटे-पाटील (458 मते)
काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मते)
भाजपचे प्रविण पोटे यांचा 441 मतांनी विजय
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - रामदास आंबटकर (528 मते)
काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (491 मते)
भाजपचे रामदास आंबटकर 37 मतांनी विजयी
..........................................