दखल - पक्षनिष्ठेची ऐशीतैशी; धनशक्तीच्या गळ्यात विजयश्री
लोकशाहीत ज्याच्याकडं जास्त मतदार, त्याचा विजय असं म्हटलं जात असलं, तरी त्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. ज्याच्याकडं मतांची खरेदी करण्याची ताकद, त्याच्या घरी लोकशाही पाणी भरी अशी तर्हा सध्या आहे. पक्षनिष्ठांना इथं कवडीमोल आहेत. विकत घेणारे आहेत, तसंच विकल्या जाणार्यांची संख्याही जास्त आहे. मतदार पैसे घेतात, हे आता उघडंनागडं सत्य आहे. सामान्य मतदारांपेक्षा विधान परिषद व राज्यसभेसाठी मतदान करणार्यांचं विक्री मू्ल्य जादा असतं. एखाद्या पक्षामागं त्या मतदारसंघात किती मतदार आहेत, यापेक्षा उमेदवाराची मतं खरेदी करण्याची क्षमता किती आहे, याला तिथं महत्त्व असतं.
....................................................................................................................................................
राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या सद्स्यांना पूर्वी सरंपच निवडीसाठी सहली घडवून आणल्या जातं. गुजरातमधील अहमद पटेल यांच्या निवडीसाठी आमदारांना कर्नाटकमध्ये कसं शाही व्यवस्थेत ठेवण्यात आलं होतं, हे सर्वश्रुत आहे. कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांना विश्वासदर्शक ठरावापर्य्ंत दहा दिवस कसे बंदिवासात घालवावे लागले, हे ताजं उदाहरण. पक्षांच्या आमदारांना, खासदारांना इतर पक्ष फोडतील या भीतीनं पळवून नेलं जात असेल, तर आपल्याच आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांवर आपला विश्वास नाही, हे सिद्ध होतं. अर्थात ही वेळ संबंधित मतदारांनीच आपल्या पक्षांवर आणली आहे, हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्रात आज मतमोजणी झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागाचे निकाल पाहिले, तर निकालानंतर सर्वंच पक्षांत संशयाचं वातावरण तयार झालं आहे. त्याचा परिणाम लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तसंच अन्य ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादीचं या निवडणुकीत सर्वांधिक नुकसान झालं, तर शिवसेनेचा फायदा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेत सर्वांत मोठा पक्ष आहे. आता निवृत्त झालेल्या सदस्यांतही राष्ट्रवादीचे तीन, भाजपचे दोन व काँग्रेसचा एक सदस्य होता. गेल्या चार वर्षांत झालेल्या निवडणुकांत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचं बळ वाढलं, शिवसेनेचंही वाढलं. राज्यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडीत राष्ट्रवादीचं सर्वाधिक नुकसान झालं. असं असताना भाजपच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी दोन्ही काँग्रेस एक झाल्या. जागांची अदलाबदल केली ; परंतु त्यातून काँग्रेसच्या हातात काहीच पडलं नाही. विधान परिषदेची होती, ती जागा गमावली. भाजपनं होत्या त्या तीन जागा परत मिळवल्या. शिवसेनेकडं एकही जागा नव्हती. पालघरचा वचपा काढण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीच्या मागं ताकद उभी करण्याच्या वावड्या उठविल्या ; परंतु रायगड वगळता अन्य कुठंही भाजपनं राष्ट्रवादीला मदत केल्याचं दिसत नाही. या निवडणुकीचे निकाल पाहिले, तर छगन भुजबळ यांची शिवसेनेला मदत झाल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रवादीनं ते नाकारलं असलं, तरी शिवसेनेचा नाशिकमधील विजय पाहता त्यात तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद-बीड-लातूरचा निकाल उच्च न्यायालयाच्या अधीन असल्यामुळं तिथं राष्ट्रवादी, की भाजप हे ठरायचं आहे ; परंतु शिवसेना-भाजपतील भांडणाचा फायदाही दोन्ही काँग्रेस उठवू शकत नाही, हे पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे. विधानपरिषद निवडणूक ही मर्यादित मतदारांची असते. त्यामुळं तिथं घोडेबाजार कायम होत असतो. विशेषतः अमरावती व हिंगोली-परभणी मतदारसंघात भाजप व शिवसेनेनं घेतलेली मतं पाहता पक्षनिष्ठा कशा विकावू असतात, याचा प्रत्यय आलेला दिसतो. स्वतः च्या पक्षाची मतं जिथं सुरक्षित ठेवता येत नाहीत, तिथं मित्रपक्षाचा कसा भरवसा ठेवता येईल, असं कुणी विचारलं, तर काँग्रेसकडं त्याचं उत्तर असणार नाही.
विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. या विजयात भुजबळांनीही हातभार लावला, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. हे दराडे भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील आहेत. तसेच ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना आतापर्यत आमदारकीनं हुलकावणी दिली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भुजबळ यांचा मुलगा पंकज यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव यांना भुजबळांच्या सुटकेचे पेढे भरवायला त्यांना वेळ होता ; परंतु राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला पेढे द्यावेत, असं त्यांना वाटलं नाही. दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीच्या शिवाजी सहाणे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे सहाणे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, मनसे अशी महायुती असतानाही दराडे यांनी मोठ्या फकरानं विजय मिळविला. भाजपकडं 197 मतं असताना आणि त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असताना त्यांच्याकडच्या मतांच्या संख्येपेक्षा अधिक मतांनी सहाणे यांचा परभव झाला. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोन वर्ष तुरुंगात काढल्यानंतर भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची पुरेशी पाठराखण केली नाही व त्यामुळं आगामी काळात ते वेगळ्या पर्यायाचा विचार करू शकतात, अशी चर्चा आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातूनही भुजबळांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती.
कोकणची जागा तटकरेंनी जागा आपल्याच घरात ठेवण्यात यश मिळवलं. विधान परिषदेतील रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे विजयी झाले आहेत. भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळं अनिकेत तटकरे यांना भरघोस मताधिक्यानं विजय मिळवता आला असून त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला. या मतदारसंघात शिवसेनाविरोधात इतर सर्व असं चित्र होतं. खासदार नारायण राणे यांच्याकडं नव्वदहून अधिक मतं होती. ती कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळणार नव्हती. राणे यांना पूरक भूमिका भाजपनं इथं घेतल्याचं दिसतं. रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातील तीन जिल्ह्यांमध्ये मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 940 मतदार होते. 620 मते तटकरे यांना मिळाली असून साबळे यांना फक्त 306 मतांवर समाधान मानावं लागले. काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्षानंही तटकरे यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केल्यानं अनिकेत तटकरे यांचं पारडं जड होतं. विधान परिषदेतील अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज संस्थेच्या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे तर वर्धा येथे भाजपचे रामदास आंबटकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार खासदारांपर्यंत सर्वच कामाला लागले होते. या निवडणुकीत आंबटकर यांवना 528 मते मिळाली. तर काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना 491 मते मिळाली. आंबटकर यांच्यासाठी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शेवटच्या क्षणी सूत्रं हाती घेत रचलेले डावपेच निर्णायक ठरले. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पोटे विरुद्ध काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात लढत होती. या मतदारसंघात भाजपचे 200, काँग्रेसचे 128, राष्ट्रवादी काँग्रेसचे 40, शिवसेनेचे 28, प्रहार, युवा स्वाभिमान, इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 489 मतदार होते. यातील 488 जणांनी मतदान केलं होतं. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी पोटे यांना पाठिंबा दिल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात होतं. काँग्रेसची स्वत:ची 128 मतं होती. पण, माधोगडिया यांना केवळ 17 मतं मिळाली. विधान परिषदेतील परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. ही जागा पूर्वी राष्ट्रवादीची होती. बाबा दुर्राणी तिथं आमदार होते. राष्ट्रवादीनं ही जागा काँग्रेसला सोडल्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य नाराज होते. शिवसेनेकडं कमी मतं असतानाही बाजोरिया यांनी भगवा फडकावला. परभणीच्या निकालाचं भांडवल करून काँग्रेस गोंदिया-भंडारा मतदारसंघात हात आखडता घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.