मंदिरासमोर अचानक खड्डा! पुरातन भुयाराची शक्यता
येथील रोहिदास महाराजांच्या मंदिरासमोर आज {दि. ४} दुपारी एकच्या सुमारास अचानकपणे जमीन खचून खड्डा पडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. महसूलचे मंडलाधिकारी कळसकर, कामगार तलाठी महेंद्र काळे, कोतवाल शैलेश शिंदे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, आढळगावमध्ये जुने वाडे आहेत. यापैकी एखाद्या जुन्या वाड्यातील हे भुयार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
