Breaking News

डॉ. बी. जे. खताळ गांधीवादी नेते : डॉ. सप्तर्षि

संगमनेर /प्रतिनिधी।माजीमंत्री डॉ. बी. जे. खताळ पाटील हे संगमनेरतील एक आश्वासकभाग ठरले. ते खरे गांधीवादी विचारांची माणसे शंभर वर्षे जगतातच असे मानले जाते. संगमनेरचे खरे गांधीवादी खताळ नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. 

शहरातील मालपाणी लॉन्स येथे माजीमंत्री डॉ. बी. जे. खताळ पाटील यांचा शतकमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती बी. जे. खताळ, शिक्षकतज्ञ एम. एस. गोसावी, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आदींसह खताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सप्तर्षि म्हणाले, समाजात पाच टक्के लोक सच्चे, पाच टक्के कच्चे तर ९० टक्के लोक लुच्चे असतात. मात्र ज्याठिकाणी सच्चे लोक असतात, त्यांना सलाम करावा लागतो, असे उच्च विचार माजीमंत्री बी. जे. खताळ पाटलाचे आहेत. नुसते लग्न, दहावे या कार्यक्रमांना गेल्यानंतर लोक आपल्याला मानतील आणि ओळखतील, असे राजकीय पक्षाच्या पुढार्यांना वाटते. मात्र खताळ यांनी आयुष्यात कायम सर्वसामान्यांची कामे केली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, बी. जे. खताळ शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगले. असे आयुष्य जगलेले या सभागृहात दुसरे कोणीच नसेल. त्यांच्या काळातील एकही मंत्री राज्यात शिल्लक राहिलेला पाहावयास मिळत नाही. खताळ हे तत्वाशी कायम एकनिष्ठ राहिले. दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधला, म्हणून ते शंभर वर्षे चांगले जीवन जगले.