Breaking News

वडुले बुद्रुकच्या सरपंचपदी प्रदीप काळे


शेवगाव - शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीला 7 जागा मिळून प्रदीप नानासाहेब काळे यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांना 1207 मते मिळाली. ग्रामविकास आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे वाल्मीक कबाडी, गर्जे आशाबाई सुहास, अलका उद्धव बाबर, निकाळजे कृष्णा, हारदास शोभा पांडुरंग, जर्गे सुनीता गणेश. ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व कॉ. शशिकांत कुलकर्णी, बाळासाहेब काळे , गंगाधर चोपडे , मुरलीधर सागडे, सुभाष टेकुळे यांनी केले .

गणेश पाखरे, विजय पाखरे, अंबादास काळे, ज्ञानेश्‍वर जगताप, मुरलीभाऊ काळे व समस्त युवा ग्रुप वडुले बुद्रुक यांनी विशेष परिश्रम घेतले. भाजपचे तालुका सरचिटणीस भीमराज सागडे यांच्या मंडळाचे 3 उमेदवार विजयी झाले. सरपंच पदासाठी ते पराभूत झाले. नवनिर्वाचित सरपंच प्रदीप नानासाहेब काळे व विजयी सदस्यांचे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले यांनी अभिनंदन केले आहे.