Breaking News

मुळा टेलच्या शेतकर्‍यांचा पाटपाण्याचा प्रश्‍न मार्गी - सुभाष बरबडे


भाविनिमगाव - शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्‍नावर वेळोवेळी पाठपुरावा करत संबंधित पाटबंधारे अधिकार्‍यांना टेल टू हेड या पध्दतीने सर्व शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहोचवण्याच्या तातडीने सूचना केल्या होत्या. आज मितीला टेल टू हेड सर्व शेतकर्‍यांना पाणी मिळाले असून शेतकरी वर्ग समाधानी आहे. या आवर्तनाला शेतकर्‍यांचा पाटपाण्याचा प्रश्‍न मार्गी लागल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुभाष बरबडे यांनी केला आहे. आज मितीस टेल टू हेड पाणी खालीलप्रमाणे मिळाले आहे . 

पाटबंधारे शाखा क्र 2 वरील वितरिका क्र. 3 व वितरिका 4 वर अनुक्रमे 14 व 13 पाणी वापर संस्था असून त्यातील वितरिका क्र 3 व 4 वर अनुक्रमे 5 व 9 आशा एकूण 14 पाणी वापर संस्था शेवगाव तालुक्यातील आहेत. वरील संस्थाना 03 मे 2018 पासून पाणीपूरवठा सुरळीत चालू आहे. दहीगाव ने ,रांझणी , मठाचीवाडी वरील गावंच्या सात पाणी वापर संस्थाना सुमारे 432 क्युसेस पाणी पूरवठा करण्यात आला आहे . वितरिका क्र. 4 वर भायगाव ,मजलेशहर ,देवटाकळी येथील सहा पाणी वापर संस्थाना सुमारे 564 क्युसेस पाणी पूरवठा करण्यात आला आहे . फक्त देवटाकळी येथील पाणीवापर संस्था मागील दोन आवर्तनांपासून पाणी घेत नसल्या कारणाने संबंधित पाणी वापर संस्थेला पाणी देण्यास उशीर झाला . वरील गावंच्या सर्व पाणी वापर संस्थाना मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला आहे .अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली असल्याचे सुभाष बरबडे यांनी सांगितले 

मा.आमदार राजळे यांनी फक्त पाणी प्रश्‍नावरच नव्हे तर विज प्रश्‍न, पंचायत व तहसील कार्यालयातील सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लावले आहेत.त्यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यात बोंड अळीचा सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व पाटपाण्याचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल शहरटाकळी परिसराच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राजीव राजळे मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष बरबडे , ग्रा.पं .सदस्य रामप्पा गिरम , मोहनराव खंडागळे , आसाराम शिंदे , बाळासाहेब विखे , दत्तात्रय गिरम यांनी दिली .