Breaking News

गोपाळपुर येथे त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


भेंडा -  नेवासा तालुक्यातील आदर्श गाव गोपाळपुर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही त्रिदिनात्मक अखंड हरीनाम सप्ताहाचे व श्री समर्थ सदगुरु किसनगिरीबाबांचे श्री किसनगिरी विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे 5 वे वर्ष आहे. बुधवार दिनांक 30 मे पासून सप्ताहास प्रारंभ होणार आहे.

सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 7 हनुमान चाळीसा, 8 ते 10 श्री किसनगिरी विजय ग्रंथ पारायण व चिंतन, दुपारी 4 ते 5 यावेळेत विविध महाराज मंडळीच्या वाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 6 ते 7 हरीपाठ व बुधवार दिनांक 30 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 यावेळेत स्वामी अरूणनाथगिरीजी महाराज, भामाठाण गुरुवारी 9 ते 11 यावेळेत विवेकानंद शास्त्रीजी महाराज यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 01 जून रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. परिसरातील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी, पोलिस मित्र समिती व गोपाळपुर ग्रामस्थांनी केले आहे.