Breaking News

घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अटकेत


औरंगाबाद, दि. 08, मे - 2002 मध्ये झालेल्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबाद येथून अटक केली. इरफान गुलमोहम्मद कु रेशी असे आरोपीचे नाव आहे. इरफानला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले आहे. 


आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 2002 साली घाटकोपर पश्‍चिम येथे एका बसमध्ये स्फोट झाला होता. त्यात 4 जण ठार आणि 32 जण जखमी झाले होते. या गुह्यातील 9 जण अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जातो आहे.