महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सायबर समिती !
मुंबई, दि. 08, मे - सामाजिक माध्यमातून (सोशल मीडिया) महिलांच्या विरोधात केल्या जाणार्या अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्लील वक्तव्ये अथवा टिप्पणी करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सायबर समिती स्थापन केली आहे.
सामाजिक माध्यमाद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रांत काम करणार्या महिला तसेच महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या कि, जाहीर अवमानकारक टिप्पणीचा महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते तेव्हा अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. म्हणून तज्ञ व्यक्त ींचा समावेश असलेली समिती आयोगाने स्थापन केली असून यासंदर्भात समितीकडून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सादर केला जाईल.
