ब्राम्हणपुरीत 25 लाखांची चोरी
नंदुरबार, दि. 08, मे - ब्राम्हणपुरी येथे सोमवारी दुपारी एकाच्या बंद घराचे कुलूप तोंडून अज्ञात चोटड्यांनी 25 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
भरत पाटील हे कुटूंबासह लग्नाला घर बंद करुन गेले, या संधीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोंडून आत प्रवेश केला. सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लपास केल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलिसांचे पथक व श्वान पथक दाखल झाले होते. या प्रकरणी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते.
