Breaking News

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे विमानतळावर स्वागत


पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

तसेच सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आर्मीचे लेफ्टनंट जनरल डी. आर.सोनी, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.