Breaking News

ओडिशा चकमकीत सात माओवादी ठार

भुवनेश्‍वर : ओडिशामधील कंधमाल आणि बलांगीर जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या चकमकीमध्ये सात माओवादी ठार झाले आहेत.पाच माओवादी कंधमालच्या गोलंकी गावातील सुदुकुंपा जंगलात झालेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये ठार झाले तर 2 माओवादी बलांगीर जिल्ह्याच्या दुडकमल गावात मारले गेले, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. पी. कोचे यांनी दिली. टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि विशेष ऑपरेशन गटाने सुदुकुंपा जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरु केले. या ठिकाणी पोलिसांनी नऊ रायफल्स जप्त केल्या आहेत. तसेच ए. के. 47 आयएनएसएएस आणि इतर शस्त्रांस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. हे सांघिक यश आहे. जिल्हा पो लिस अधीक्षकांनी धैर्य आणि आत्मविश्‍वासाने हे ऑपरेशन पूर्ण केले. हा दिवस ओडिशा पोलिसांच्या इतिहासातील रेड लेटर डे असल्याचे पोलीस महासंचालक आर. पी. शर्मा यांनी म्हटले आहे.