Breaking News

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : काळे

कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत. मात्र प्रशासकीय अधिकारी कामात हलगर्जीपणा करीत आहेत. यापुढे प्रशासकीय अधिका-यांचा कोणताच हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे खडे बोल पंचायत समिती सदस्य गटनेते अर्जुन काळे यांनी सुनावले.

सभापती अनुसया होन यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी काळे बोलत होते. दरम्यान, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत अशा कामचुकार अधिका-यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन या सभेत दिले.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अनिल कदम, मधुकर टेके, श्रावण आसने, बाळसाहेब राहाणे, पौर्णिमा जगधने, वर्षा दाणे, सुनिता संवत्सरकर, उपअभियंता एस. टी. घुले, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. पी. डी. दहे, कृषी अधिकारी अशोक आढाव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. डी. वाघिरे आदींसह तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.