केंद्र शासनाकडून सन 2014 मध्ये महापालिका परिवहन उपक्रमासाठी मंजूर झालेली जेएनएनआरयूएमची योजना चुकीच्या पद्धतीने राबविल्याने परिवहनचे कर्मचारी देशोधडीला लागले, असा आरोप करतानाच या प्रकरणासंदर्भात पुरावे देऊनही कारवाई होत नाही, असा आरोप परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांनी केला आहे. सोलापूर दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मस्के तसेच शिवसेनेच्या पदाधिका-यांनी संयुक्तपणे निवेदन दिले. या निवेदनात वरील आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या योजनेंतर्गत केलेल्या बस खरेदची सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी मस्के यांनी या निवेदनात केली आहे.या उपक्रमावर जवळपास 37 कोटींचा बोजा आहे. सेवकांचे 9 महिन्यांचे वेतन तसेच 6 महिन्यांची पेन्शन थकीत आहे. याबाबत कर्मचारी न्यायालयात गेेले आहेत. याचा विचार करता देय रकमा द्याव्या लागणारच आहेत. थकीत वेतनासाठी संप सुरू आहे. संपूर्ण थकीत वेतन मिळाल्याशिवाय संप मागे न घेण्याची कर्मचा-यांची भूमिका आहे. आयुक्तांना तीन वेळा निवेदन दिले. मात्र, परिवहन उपक्रमाचा मनपाशी काही संबंध नाही, माझ्याकडे पैसा नाही, मी एक दमडीही देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही बाब बेजबाबदारपणाची आहे. नजीकच्या काळात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता असल्याने त्यास सर्वस्वी आयुक्तच जबाबदारी राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. शासनाने परिवहनचा प्रश्न मिटण्यासाठी 19 कोटी 92 लाखांचा निधी द्यावा, तसेच परिवहन व्यवस्थापकपदी तांत्रिक अधिकारी द्यावा, अशा मागण्याही क रण्यात आल्या आहेत.
जेएनएनयूआरएम योजनेमुळे परिवहनचे कर्मचारी देशोधडीला
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:59
Rating: 5