Breaking News

‘समृद्धी’साठी ९ रोजी उपोषण


कोपरगाव : तालुक्यातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध येत्या बुधवारी {दि. ०९ } तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली. यासंदर्भात कोपरगाव तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.या निवेदनावर रावसाहेब थोरात, सुरेश गिरे, अस्लम शेख, संजय दंडवते, अशोक कानडे आदींसह शिवसेना पदाधिकार्यांचा सह्या आहेत.