Breaking News

अथर्व शिरसाठची जेईई ऍडव्हान्ससाठी निवड


प्रवरानगर : प्रवरा पब्लिक स्कूलच्या उच्च माध्यमिक विभागातील अथर्व शिरसाठ याने एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेमध्ये ३६१ पैकी १५७ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याची जेईई ऍडव्हान्ससाठी निवड झाली, अशी माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली. अथर्वने कोणतेही खाजगी क्लास न लावता वर्गातील अध्ययनातून अभ्यास करून हे यश मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल प्रवरा पब्लिक स्कूलचे डायरेक्टर कर्नल डॉ. भारतकुमार सिंग, समन्वयक एस. व्ही. गोडगे, सुपरवायझर एम. एस. जगधने आआदींसह शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.