कुंटणखान्यावर छापा ; चालकाला अटक
शहरातील मेन रोड भागात देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली. त्या आधारावर पो. नि. औताडे यांनी तहसील कार्यालयातील दोन शासकीय पंच व्यक्ती बोलावून फिर्यादी पो. शि. सचिन कचरू उगले आणि तोतया ग्राहकाला पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन या अड्ड्यावर पाठविले. त्याचवेळी पोलिस व शासकीय पंच अड्ड्यावर पोहचून देहविक्री करणाऱ्या महिलेला व तिचा साथीदार चालक कैलास सुरेश वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी आरोपी कैलास सुरेश वर्मा व गुंजाळ काका (फरार आरोपी-पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आज { दि. ४ } आरोपी वर्मा याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर महिलेला समुपदेशनासाठी महिला सुधारगृहात रवाना करण्याचे निर्देश देण्यात आले.
