Breaking News

राहत्यामध्ये १० कोटींचा पीकविमा मंजूर


लोणी प्रतिनिधी  - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता तालुक्यातील शेतक-यांना १० कोटी ५२ लाख रूपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

तालुक्‍यातील पेरु पीकासाठी २१५ शेतक-यांनी ३६७ हेक्‍टर क्षेत्राचा पीक‍ विमा भरला होता. डाळिंब पिकासाठी २ हजार ३९० शेतकरी लाभार्थी आहेत. १ हजार ९२३ हेक्‍टरचा पिकविमा या शेतकऱ्यांनी भरला होता. चिक्‍कु पिकासाठी २३ शेतक-यांनी २० हेक्‍टरचा पिक विमा भरला होता. या सर्व पीकासाठी ४४ लाख ७४ हजार ६०० रुपये मंजुर झाले आहेत. सदर योजनेचा विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला. त्यामुळे ७९४ शेतक-यांचे ३ कोटी ९८ लाख रुपये पिक विम्‍याचे पैसे लाभार्थ्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंक खात्‍यात वर्ग झाले आहेत. उर्वरित १ हजार ८३३ शेतक-यांचे ६ कोटी ५४ लाख जिल्‍हा बॅंकेत लवकरच वर्ग होणार असल्‍याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.