Breaking News

नामस्मरणातून ज्ञानाचा प्रकाश आणि अज्ञानाचा नाश महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन

कोल्हार प्रतिनिधी - परमात्मा भक्तांकरिता कोमल तर दृष्टांकरिता कठोर बनतो. ईश्वराच्या नामामध्ये चैतन्य आणि दिव्यशक्ती आहे. त्याच्या नामस्मरणातून ज्ञानाचा प्रकाश जीवनात पडतो. तेव्हा अज्ञानाचा नाश होतो आणि जीवन आनंदमय होते, असे प्रतिपादन सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. कोल्हार भगवतीपूर येथे श्री भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात अधिकमासानिमित्त आयोजित संत तुकाराम गाथा पारायण सोहळा व राष्ट्रीय किर्तनकार रामदास उर्फ शिवराज महाराज जाधव यांच्या अमृतवाणीतून संत भागवत कथा महोत्सवाच्या सांगताप्रसंगी काल्याच्या कीर्तनात महंत रामगिरी महाराज बोलत होते. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, विश्वस्त बापूसाहेब देवकर, ज्ञानदेव दळे, बाळासाहेब राऊत, दिनकर कडसकर, श्रीकांत खर्डे, सचिव भानुदास शिंदे, उपसरपंच स्वप्नील निबे, अशोक दातीर, बी. के. खर्डे, अशोकराव खर्डे, पंढरीनाथ खर्डे, मधुकर खर्डे, व्यासपीठचालक अशोक महाराज भोसले, नामदेव महाराज जाधव आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता श्री संत तुकाराम गाथा मिरवणूक व त्यानंतर दीपवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.