विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न टाकता त्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज
बुरुडगाव रोड येथील मोमीनपुरा परिसरात नगरसेवक गणेश भोसले यांनी महापालिकेच्या माध्यमातून टिम टॉपर्स अॅकॅडमीला उपलब्ध करुन दिलेल्या ओपनस्पेस वर उभारण्यात आलेल्या मैदानाचे व कै.पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंगचा शुभारंभ गणेश भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत पाटोळे, उपाध्यक्ष सागर कुक्कडवाल, सचिव सागर भिंगारदिवे, सह सचिव अंकुश नागर, आसिफ शेख, सुनिल डहाळे आदि उपस्थित होते.
पुढे भोसले म्हणाले की, बुरुडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावून संपुर्ण परिसर हरीत करण्यात आला आहे. झाडे लावण्यापेक्षा ते जगवणे कठिण आहे. झाडाशिवाय परिसराला सौंदर्य नसून, या मैदानाभोवती झाडे लावण्याचे त्यांनी आवाहन केले. स्केटिंगच्या खेळाडूंना अद्यावत स्केटिंग ट्रॅक उपलब्ध होवून, उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी टिम टॉपर्सच्या अॅकॅडमीन ेबुरुडगाव येथे वेड्या बाभळीने वेढलेल्या ओपनस्पेसवर दोन महिन्यात सुसज्ज मैदान उभारले आहे. या मैदानाची जागा उपलब्ध करुन देण्यासाठी गणेश भोसले यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. टिम टॉपर्सच्या कमिटी सदस्यांनी निधी जमा करुन हे स्केटिंगचे मैदान विद्यार्थ्यांसाठी फुलवले असल्याची माहिती प्रशांत पाटोळे यांनी दिली. उत्कृष्ट रित्या तयार करण्यात आलेल्या ट्रॅक बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केला.
टिम टॉपर्सच्या अॅकॅडमीच्या वतीने एक तास न थांबता स्केटिंगची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सहभागी खेळाडूंना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी पंकज पटेल, अनुप गुंदेचा, अरविंद आगरकर, मनोज काथेड, चंद्रकांत निकम, महेश बागल, सागर बोरा, पंकज खंडेलवाल, राहुल भळगट, डॉ.राऊत, मुख्यध्यापक शिवाजी लंके आदि पालकांसह नगर, पुणे, जळगाव, जुन्नर, जालना व पाथर्डी येथील अॅकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव डहाळे, मुख्य प्रशिक्षक आकाश भिंगारदिवे, अजीम शेख, नेहा बोकरीया, रावसाहेब मोरकर, रुशी तारडे, विजय आगळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीच्या निवेदिका विना दिघे यांनी केले. आभार सागर भिंगारदिवे यांनी मानले.