पुणे, दि. 30, मे - डाकसेवकांना क कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी देशभरातील 2 लाख 70 हजार डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुरविली जाणारी टपाल सेवा ठप्प झाली आहे. ग्रामीण डाकसेवक घरपोच देत असलेल्या स्पीड पोस्ट, रजिस्टर, मनिऑर्डर सेवा मिळणे ग्रामीण भागातील नागरिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे घरापासून दहा ते बारा किलोमीटर असणार्या पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांना सेवा घेण्यासाठी स्वत: यावे लागत आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या संपाचा कुरिअर सेवांना मात्र फायदा होत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण डाकसेवक 22 मे पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सहा दिवसांपासून मुलाखतीचे पत्र, निमंत्रणे, पुस्तके, मनिऑर्डर, पत्रिका, प्रकाशने आदी महत्त्वाच्या टपालांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. डाकसेवकांच्या संपामुळे हजारो टपाल पडून आहे. पिंपरी -चिंचवड मध्ये जवळपास शंभर ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. यामध्ये ताथवडे, थेरगाव, पुनावळे, तळवडे, जांबे, वाकड या ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये हे डाकसेवक डिलिव्हरीचे काम करतात.
डाकसेवक संपावर, ग्रामीण टपाल सेवा ठप्प
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:45
Rating: 5