विद्यार्थिनींनी आपल्या क्षमतेनुसार महाविद्यालयाच्या विकासाकरिता सहकार्य करावे - वैशाली गुंड
सोलापूर, दि. 30, मे - शाळा असो किंवा विद्यालय, या संस्थांमुळे आपल्यावर संस्कार घडलेले असतात, करिअर तयार झालेले असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींनी आपल्या क्षमतेनुसार त्या महा विद्यालयाच्या विकासाकरिता सहकार्य करावे, असे आवाहन माजी विद्यार्थिनी वैशाली गुंड यांनी केले. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजिण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, आयुष्याच्या शेवटपर्यंत माणूस हा विद्यार्थीच असतो. ज्या संस्थेने आपल्यावर संस्कार घडवले त्या संस्थेबद्दल आपुलकी असावी. शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणाकरिता व्हावा. करिअर करून मोठे झाल्यानंतर संस्थेच्या कल्याणाकरिता प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. आर.पी. धवन, प्रा. एस.पी. राजगुरू यांच्यासह ज्योती मोरे, प्राजक्ता भगरे, लक्ष्मी गायकवाड या माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. देवराव मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली गिरी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी महाविद्यालयाचा इतिहास आणि कार्याचा आढावा घेतला. प्रा. मनीषा टांक यांनी आभार मानले.