रविवारी लिंगायत धर्म महामोर्चा
सोलापूर, दि. 30, मे - लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी रविवारी (दि.3 जून) सोलापूर येथे लिंगायत धर्म महामोर्चा क ाढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी दिली. दरम्यान लिंगायत धर्म मान्यतेच्या मागणीला तीव्र विरोध असून लिंगायत धर्म मोर्चामध्ये वीरशैव लिंगायत समाजाने सहभागी होऊ नये, असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.
या मोर्चाची सुरुवात रविवारी सकाळी दहा वाजता कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. येथून मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंच कट्टा ते होम मैदान येथे जाऊन जाहीर सभेने समारोप करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा यामधून लाखो लिंगायत समाजबांधव येणार आहेत. पन्नासहून अधिक लिंगायत धर्मगुरू या मोर्चात सहभागी होणार आहेत. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने त्वरित लिंगायत धर्मासंबंधी केंद्र सरकारला शिफारस पाठवावी व लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी असणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.