Breaking News

शिक्षकांनो अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी ठेवा - संजय सावंत


सोलापूर - डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा प्रसार करणे काळाची गरज आहे. त्याबरोबरच शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी पदाधिकार्‍यांनी ठेवावी. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका असावी, असे मत शिक्षक संघाचे प्रवक्ते संजय सावंत यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी घेण्यात आलेल्या सहविचार सभेत ते बोलत होते. 

संघटनेचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे : शहाजी रंदवे (जिल्हा सचिव), अनिरुद्ध सुर्वे, प्रदीप जाधवर (कार्याध्यक्ष), अनिल गायकवाड (संपर्कप्रमुख), प्रदीप सातपुते (जिल्हा उपाध्यक्ष), वजीर शेख (सहखजिनदार), अतुल नारकर (प्रवक्ता), मंजूषा मुळे (महिला आघाडी प्रमुख), शाम कदम (शिक्षकेतर जिल्हाप्रमुख). तालुकाध्यक्ष याप्रमाणे - संतोष भद्रशेट्टी (शहराध्यक्ष), प्रकाश बाळगे (माळशिरस), सिद्धेश्‍वर पवार (मंगळवेढा), हणमंत भोसले (पंढरपूर), नितीन भांगे (दक्षिण सोलापूर), अजित कणसे (करमाळा), संतोष रजपूत (उत्तर सोलापूर), धन्यकुमार स्वामी (मोहोळ) आदींची निवड केली.