Breaking News

गुजरातच्या व्यापार्याचे अपहरण करुण, 28 लाख गडंविणारा जाळ्यात


धुळे - पोलीस असल्याचे भासवून गुजरातच्या व्यापार्याचे अपहरण करीत त्याच्याकडील 28 लाखांच्या रोकडवर डल्ला मारणा-या मुंंबईतील ओशीवरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

अमरतभाई हिराभाई पटेल (43, उमियानगर मोढेरा, ता.वेचराजी, जि.म्हैसाणा गुजराथ, ह.मु.ईश्‍वर कॉलनी, जळगाव) हे व्यापारी धुळे बसस्थानकावर 16 मे रोजी जळगाव-नंदुरबार बसने धुळे स्थानकावर उतरले तर सुरत जाण्यासाठी बसमध्ये बसण्यापूर्वीच पोलीस असल्याचे दर्शवून आरोपींनी त्यांना ताब्यात घेत इनोव्हा कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले तर त्यांच्याकडील 28 लाख 10 हजारांची रोकड लूटत तसेच त्यांच्या मोबाईलमधील बॅटरी व सीम काढून त्यांना धुळे-नगाव रोडवरील तिसगाव ढंढाणे गावाच्या शिवारात सोडले होते. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू असतानाच गुप्त माहितीनुसार आरोपींना अटक करण्यात आली. 

यात प्रथमेश पांडुरंग खवनेकर (24, रा.66. इंदिरानगर, बांद्रेकर वाडी, योगेश्‍वरी पूर्व, मुंंबई), विजय मनोहर चंदणे (29, रा.कल्याणी इंदिरानगर, घ.नं.23, जोगेश्‍वरी, पूर्व मुंबई), प्रवीण सुरेश सावंत (33, रूम नं.2, शिवसागर चाळ, महाराष्ट्र नगर, कुरार विल्हेज, मालाड पूर्व, मुंबई नंबर 97), संजय देवराम पवार (50, हवालदार ओशीवरा पोलीस ठाणे, न्यू म्हाडा, पोलीस क्वार्टर, बिल्डींग नंबर एक, रूम नंबर 507, मुंबई साईसिद्धी बिल्डींग, पाचवा माळा, रूम नंबर 1504 प्रतापनगर, जोगेश्‍वरी पूर्व मुंबई) या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 लाख 56 हजारांच्या रोकडसह 12 लाख रुपये किंमतीची इनोव्हा मिळून 23 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.