कृषीसमृद्धी केंद्रात नव्या गावांचा समावेश
शिर्डी / प्रतिनिधी राहाता आणि कोपरगाव या तालुक्यांच्या सीमेवरून जाणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रात धोत्रे आणि वैजापूर तालुक्यातील धोत्रे, पुरणगाव, बापतरा आणि लाख या गावांचा समावेश करण्यात आला आहे. समृद्धी हा मार्ग कोपरगाव तालुकातून दहा गावातून जातो. या महामार्गावरील १६ नवनगरे उभे राहणार आहे. त्यापैकी प्रथम कोपरगाव, वैजापूर सीमेवर एक वर्धा जिल्ह्यात एक या दोन समृद्धी शहरांना राज्यपालाची मंजुरी मिळाली आहे. सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. धोत्रे, लाख, बापतरा आणि पुरणगाव येथील प्रकल्पास नगररचना विभागची मंजुरी मिळाली आहे. हे शहर जेव्हा उभी होईल, तेव्हा ते इतरांसाठी ‘रोलमॉडेल’ ठरणार आहे. चौकट समृद्धी’ने आणली आर्थिक समृद्धी ७०० किलोमीटर लांबी, ३९२ गावांचा समावेश कोट्यावधी रुपये खर्च असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या गावांचा समावेश होऊन संपादित जमिनींचा मोबदला मिळाल्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे.