Breaking News

लोकसभा व राज्यसभेचे आधिवेशन शेतकर्‍यांसाठी बोलवावे, स्वाभिमानीची मागणी


सातारा, दि. 12, मे - आज स्वाभीमानीच्या वतीने लोकसभेचे व राज्यसभेचे शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालाला हमीभाव याविषयी खास अधिवेशन बोलवावे या विषयीचे जिल्ह्याधिक ार्‍यांना सातारा जिल्ह्यातील पाच हजार शेतकर्‍यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले.

देशातील शेतकर्‍यांचे वाढते आत्महत्याचे प्रमाण लक्षात घेता सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु शेतकरी रक्षणासाठी हवी तेवढी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार राजु शेट्टि देशभर बैठका घेऊन शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मोट बांधत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी लोकसभा व राज्यसभेचे आधिवेशन शेतकर्‍यांसाठी बोलवावे, व शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळण्याचा आ धिकार व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दीड पट हमीभाव मिळण्याचा आधिकार. याविषयी खास अधिवेशन बोलवावे या आशयाचे पाच हजार शेतकर्‍यांच्या सहीचे निवेदन जिल्हा धिकारी यांना देण्यात आले.