Breaking News

एनएसयुआयच्या अध्यक्षपदी निखील पापडेजा


संगमनेर : राज्याचे नेते आ. बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे खंदे समर्थक निखील पापडेजा यांची अहमदनगर जिल्हा एनएसयुआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. धुळे येथील काँग्रेस भवनात नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी निरीक्षक म्हणून कौशल सिंग तोमर (नवीदिल्ली) यांनी काम पाहिले.
पापडेजा यांनी आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवा नेते आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १० वर्षांत विद्यार्थी संघटनेत मोठे काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आ. थोरात, आ. डॉ. तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी अभिनंदन केले. पापडेजा लवकरच संपूर्ण जिल्हा दौरा करुन नवीन पदाधिकारी निवडणार आहेत. खा. राहुल गांधी आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या युवक संघटनावाढीचे काम आणखी उत्साहाने करु, असे निवडीनंतर पापडेजा म्हणाले.