Breaking News

लहान मुलांच्या भांडणातून नगरमध्ये दगडफेक

नगर/प्रतिनिधी। 21 ः लहान मुलांच्या भांडणातुन झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटात होवून दगडफेक झाल्याची घटना नगर शहरातील पंचपीर चावडी येथे सोमवारी सायंकाळी घडली. त्यामुळे परिसरातील व्यवसायीकांनी पटापट दुकाने केली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांची कुमत घटनास्थळी दाखल झाली असून या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पंचपीर चावडी भागात मुस्लिम समाजातील लहान मुुलांमध्ये खेळण्याच्या कारणावरुन वाद झाला. त्याचा जाब विचारण्यासाठी एक गट पुढे सरसावला असतानाच दुसरा गट चालुन आला. दोन्ही गटातून दगडफेक करण्यात आली असून दोन ते तिन जाणांना दगडाचा मार लागला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु त्यांची नावे मात्र समजली नाही. पोलिसा निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तातडीने दाखल झाला. तोपर्यंत दगडफेकीच्या फटक्यातुन वाचण्यासाठी व्यवसायीकांनी दुकाने बंद केली. या घटनेमुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला असून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.