Breaking News

मराठवाडयात शेतकरी आत्महत्येत वाढ चार महिन्यात 329 शेतकर्‍यांच्या आत्महत्या सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात

औरंगाबाद - कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, आज शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा समोर आलेला आकडा हा फारच धक्कादायक आहे. मराठवाड्यामध्ये 2018 या वर्षाच्या जानेवारी - मे या अवघ्या 4 महिन्यात तब्बल 329 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे पर्यंत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 329 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. भाजप सरकारच्या काळातही शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच असून, अनेक शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात यावर्षी 7 मेपर्यंत 329 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे जवळपास 4 महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक बीड जिल्ह्यात 60 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येचा आकडा पाहता संपूर्ण मराठवाड्यात महिन्याला 82 शेतकर्‍यांनी तर दिवसाला 2 ते 3 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या असतानासुध्दा शासनाने निम्म्याच शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली आहे. 329 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या असताना फक्त 165 शेतकर्‍यांनाच आ र्थिक मदत दिलेली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलेले हे सरकार मृत शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना मदत सुध्दा व्यवस्थित देत नसल्यामुळे सरक ारचा निष्ठूरपणा समोर येऊ लागला आहे.