Breaking News

प्राप्तिकर रद्द करण्याची गरजल : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : मध्यमवर्गाच्या विकास आणि आर्थिक विकास साधण्यासाठी प्राप्तिकर रद्द करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. प्राप्तिकर म्हणजे ओझं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. हैदाराबादमध्ये इंडियन एक्झिबिशन इंडस्ट्री आयोजित आठव्या आयईआयएच्या सेमिनारमध्ये सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.

मध्यमवर्गीय आणि नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्राप्तिकर अडथळ्याचं ठरत असून, प्राप्तिकर म्हणजे त्यांचा ‘छळ’ आहे, असेही स्वामी म्हणाले.भारतात प्राप्तिकर कोण भरतं? अगदी मोजक्या संख्येतील लोक भरतात. मग तुम्ही या मोजक्या संख्येतील लोकांवर प्राप्तिकराचं ओझं का टाकत आहात? असे स्वामी यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. प्राप्तिकर रद्द झाल्यास बचतीत मोठी वाढ होईल आणि परिणामी गुंतवणुकीतही वाढ होईल, असे स्वामी म्हणाले.