Breaking News

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात वाघाचा पुन्हा गावकऱ्यावर हल्ला

कटनी | मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बरही वनक्षेत्राच्या सलय्या जंगलात साेमवारी वाघाने पुन्हा एकदा एका अादिवासी गावकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले अाहे. चंदू भूमिया (वय ५५) असे हल्ला झालेल्या गावकऱ्याचे नाव असून, ताे गावातील २०-२५ जणांसह नजीकच्या जंगलात सकाळी तेंदूपत्ते ताेडण्यासाठी गेला हाेता. या वेळी दाट झाडीत लपलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले अाहे.