Breaking News

‘प्रवरा’चे प्रा. वर्पे नेट परीक्षा उत्तीर्ण

प्रवरानगर : येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. सुदाम नामदेव वर्पे हे नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील कृषी नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सदरची परीक्षा एप्रिल २०१८ मध्ये नवीदिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत घेण्यात आली होती. प्रा. सुदाम वर्पे हे महाविद्यालयातील कृषी किटकशास्त्र विभागात गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहेत. सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे आदींनी वर्पे यांचे अभिनंदन केले आहे.