अग्रलेख कर्नाटकातील राजकीय ‘डाव’
कर्नाटकामध्ये मतदानांची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसे कर्नाटकाचे रणांगण तापायला सुरूवात झाले आहे. कर्नाटकांमध्ये खरी लढत भाजपा आणि काँगे्रसमध्ये होणार आहे. क र्नाटकामध्ये जरी वातावरण तापायला सुरूवात झाली असी, तरी भाजपाच्या नेत्यांचे बेजबाबदार वक्तये काही पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपची प्रतिमा सातत्याने ढासळतांना दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्रीमंडळातील वजनदार मंत्री कर्नाटक मध्ये सभा घेऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे काँगे्रसची मदार राहूल गांधी यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या शिरावर आहे. इतर राज्यातील परिस्थिती आणि कर्नाटकची राजकीय परिस्थिती पाहता यात भलतेच अंतर आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपाला सहजासहजी जिंकता येण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे काँगे्रसच्या गोटात उत्साह संचारला असून, भाजपशासित राज्यांचा कारभारांवर टीका करत, ते भाजपशासित राज्यांतील कारभार चव्हाटयांवर आणत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार यांच्यावर यापूर्वी झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, यामुळे सर्वसामान्यांच्या मनात त्यांचा कारभार आणि प्रशासनासंबधी अनेक शंका आहेत. तसेच कर्नाटक निवडणूकांकडे भाजप गुजरातसारखे बघतांना दिसत नाही. त्यामुळे बहुमतांच्या जवळ कसे जाता येईल इतकाच होरा भाजपचा दिसून येत आहे. कर्नाटकांत जर भाजपाच्या जागा वाढल्या तर राज्यसभेत देखील भाजपाच्या जागा वाढतील, त्यामुळे भाजपाला बहुमताजवळ पोहचता येईल, असा भाजपाचा कयास आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत जर भाजपाला अपयश आले, तर कदाचित मध्यावधी लोकसभा निवडणूका घेण्याची तयारी देखील भाजप करू शकते. कारण भाजपाच्या सरकारविषयी सर्वसामान्यांत नाराजी वाढत चालली असून, ही नाराजी भविष्यात उद्र्ेक करू शकते, याची कल्पना सत्ताधार्यांना असल्यामुळे, लवकर निवडणूका घेऊन, पुन्हा सत्ता हस्तगत करणे. म्हणजेच पुढील पाच वर्षे सत्ता टिकविता येईल असा होरा भाजपाचा आहे. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हटले जायचे. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर चित्रच पालटले. भलेही गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला. पण, काँग्रेसचे संख्याबळ वाढले. ज्यामुले भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला मोठा लगाम लागला. दुसरे असे की, क र्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तसेच, भाजपला नेहमीसारखा अतिअत्मविश्वास ठेऊन चालणार नाही. कारण, कर्नाटकात काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे कर्नाटकमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय पक्षांला सत्ता मिळेल याचा निकाल लवकरच लागेल. कर्नाटकमध्ये आजमितीस अनेक प्रश्न आहेत. पायाभूत सोयी सुविधांपासून आयटी क्षेत्रातील आघाडी कायम ठेवण्याचे मोठे आव्हान या राज्यात आहे. देशभरातसह विविध राज्यात भाजपाशासित राज्यांचा कारभार देशांतील नागरिकांना पाहिला आहे. आश्वासनांशिवाय या भाजप सरकारकडून काहीच मिळत नाही, अशी सर्वसामान्यांची मते बनत चालली आहे. दुसरीकडे काँगे्रसने आपला जाहीरनामा सादर केला. मात्र असा जाहीरनामा भाजपने सादर केलेला नाही. त्यामुळे भाजपचा नेमका विकासाचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट होतांना दिसून येत नाही.