समीर भुजबळांच्या जामीन अर्जावरील सुनावणीस नकार
मुंबई : मनी लाँडरिंग कायद्याखाली अटकेत असलेले समीर भुजबळ यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. व्यस्त कामकाजामुळे सुट्टीकालीन न्यायालयाने तूर्तास त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांना पुढील सुनावणीपर्यंत जेलमध्येच रहावं लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने समीर भुजबळ यांना अंत रिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात 21 मे रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मिळाला. त्यामुळे समानतेच्या मुद्यावर आपल्यालाही जामीन देण्यात यावा अशी मागणी समीर भुजबळ यांनी केली होती.