Breaking News

'भारिप बहुजन महासंघ प्रत्येक निवडणुकीत ताकदीने उतरणार'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारतासाठी लिहिलेल्या घटनेचे उल्लंघन व त्यामध्ये बदल करण्याचे कारस्थान सत्ताधारी करत असल्याने भारिप बहुजन महासंघाने यापुढील प्रत्येक निवडणुकीत ताकदीने उतरायचे ठरवले आहे. त्यासाठी तरुणांचाही मोठा प्रतिसाद बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना व भारिप बहुजन महासंघाला मिळत आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष पी. के. गवारे यांनी केले. 

गेल्या अनेक दिवसांपासून नेवासे तालुका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष हरिश चक्रनारायण व माजी अध्यक्ष भगवान उन्हवणे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून ५० पेक्षा जास्त नवीन शाखा उघडल्या आहेत. या सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान व मेळावा बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.