Breaking News

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डे-नाईट कसोटीस भारताचा नकार


नवी दिल्ली: भारतीय संघ नोव्हेंबर महिण्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. परंतु दौरा सुरु होण्याआधी अॅडिलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यावरुन दोन्हीदेशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चांगलीच जुंपली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड अॅडिलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यासाठी उत्सुक होतं, मात्र बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डे-नाईट कसोटीस भारताचा नकार नेयासाठी आपला विरोध दर्शवला होता. अखेर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाना अधिकृतरित्या पत्र लिहीत, दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी नकारदर्शवला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांच्यात झालेल्या बैठकीत दिवस-रात्र कसोटी सामना न खेळण्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांना यासंबधातला निर्णय कळवण्यातआल्याचंही समजतंय. अमिताभ चौधरी यांनी जेम्स सदरलँड यांना इ-मेल करुन बीसीसीआयचा निर्णय कळवल्याचं कळतंय.

आतापर्यंत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ एकही दिवस-रात्र कसोटी सामना हरलेला नाहीये. भारतीय संघाला पराभवाची चिंता सतवत असल्यामुळेचदिवस-रात्र कसोटी सामन्याला नकार देत असल्याचंही सदरलँड यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये रंगलेल्या वादावर अखेर पडदापडला असं म्हणायला हरकत नाही.