अनधिकृत मदरशाचे बांधकाम दुसर्यांदा जमिनदोस्त
नवी मुंबई, दि. 3, मे - कोपरी गावात अनधिकृतपणे एका मदरशाचे बांधकाम सुरू होते या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने आज हे बांधकाम जमिनदोस्त केले. यावेळी सहाय्यक आयुक्त अंगाई साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या ङ्गिकाणी कोणतीही अनुचित घटना होऊन नये म्हणून एपीएमसी पोलीस ङ्खाण्याच्या पोलीसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला होता.
कोपरी गावालगत एका घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे मदरसा भरविला जात आहे. पूर्वी 10 बाय 10 ची असलेली ही खोली नंतर बेकायदेशीपणे वाढविण्यात आली. त्यानंतर येथे तब्बल 40 ते 50 मुले बिहार व अन्य राज्यातून मदशात शिकण्यासाठी आहेत. ही माहिती येथील पोलीस विभागाला व सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि नगरसेवकांना देखील आहे; मात्र त्यांनी याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केला होतो. परंतु मागील वर्षी या अनधिकृत मदरशामधील मुलांनी गणेशोत्सवात जवळील साईबाबा मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीवर पहाटे दगडफेक के ली होती. या मध्ये सदर मुर्ती भंग पावल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर स्थानिक शिवसेना नगरसेवक विलास भोईर यांनी पोलीस ङ्खाण्यात तक्रार केल्यावर त्या मुलांना अटक करून त्यांची बालगृहात रवानगी केली होती. तसेच सदर मदरशाच्या मौलविला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून नंतर वातावरण थंड झाल्यावर त्याच्यावर कोणतीही कारवाई न क रता त्याला सोडून दिले होते; परंतु ऐन गणेशोत्सवात कोणता जातीय दंगा होू नये म्हणून पोलीसांनी या परिसरात सात दिवस कडक पोलीस बंदोबस्त ङ्खेवला होता. गणेशोत्सवानंतर काही महिन्यांनी हा अनधिकृत मदरसा महापालिकेने जमिनदोस्त केला होता. मदरसा तोडला, तरी येथील मौलवी व मुलांनी त्या अनधिकृत जागेवर पुन्हा कब्जा करून शेड बांधली होती. त्यानंतर आता कोणी काही बोलत नाही वा पोलीस व पालिकेचेही दुर्लक्ष असल्याचे पाहून संधी मिळताच दोन आवड्या पासून पुन्हा पक्के बांधकाम सुरू केले होते. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी एपीएमसी पोलीस व महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयात माहिती दिली होती. त्यानुसार मागील आठवड्यात पालिका अधिकार्यांनी सदर बांधकाम थांबविले व घमेले, फावडे उचलून नेले होते. त्यानंतर आज पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पूर्ण जमिनदोस्त करण्यात आले. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधकाम केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ते बांधकाम त्वरित तोडले जाते; मात्र या प्रकरणात दोन वेळा अनधिकृत बांधकाम केले जात असतांनाही तसेच दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी घटना येथील मदरशांच्या मुलांनी करूनही पालिका किंवा पोलीसांकडून क ोणावरही बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.