भाजपच्या नाराज हिरे बंधूची राष्ट्रवादी कार्यालयात हजेरी
नाशिक, दि. 3, मे - भाजपमध्ये नाराज असलेले आणि सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले आ. डॉ. अपूर्व हिरे आणि त्यांचे बंधू अद्वय हिरे यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत पक्ष कार्यालयात हजेरी लावली. अद्याप हिरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला नसला तरी लवकरच ते राष्ट्रवादीत दाखल होतील, अशी औपचारीक घोषणाच प्रदेशाध्यक्षांनी केली.
गेल्या काही महिन्यांपासून हिरे कुटुंबिय भाजपांतर्गत नाराज आहेत. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांंशी जवळीक वाढली आहे. हिरे यांनी अनेकवेळा छगन भुजबळ यांची तारखेस कोर्टात जाऊनही भेट घेतली. तसेच भुजबळ समर्थकांनी सुरू केलेल्या ‘अन्याय पे चर्चा’ मोहिमेतही त्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे हिरे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष निवडीप्रसंगीही हिरे यांंनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते.
हल्लाबोल यात्रेच्या समारोपप्रसंगी नाशिक दौर्यावर आलेले पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.आज प्रदेशाध्यक्ष पाटील जिल्हा दौर्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी भवन येथे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक व पत्रकार परिषद झाली.
याप्रसंगी आ. हिरे व अद्वय हिरे, राजभाऊ डोखळे उपस्थित होते. सहाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी भवनपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हिरे बंधू प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गाडीत होते. त्यामुळे हिरे यांच्या उपस्थितीबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली होती.