Breaking News

शिरसगाव बोडख्यात चोरी


श्रीगोंदा : तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथे शनिवारी पहाटे झालेल्या चोरीत साडे दहा हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याबाबत विलास मोहन पाटोळे (रा. पाटोळेवस्ती, शिरसगाव बोडखा) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांत अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विलास मोहन पाटोळे हे शिरसगाव बोडखा शिवारात पाटोळेवस्ती येथे एकटे राहतात. शनिवारी पहाटे साडे चार वाजता ते घराला कुलूप लावून शेतात पाणी भरण्यासाठी गेले. सव्वा पाच वाजता परत आल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. घरात जाऊन पाहिले असता साडे दहा हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पाटोळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीसांत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.