नावलौकिकासाठी युवकांनी उच्चपदस्थ होणे गरजेचे : जाजू
संगमनेर युवकांनी सामाजिक ऋण फेडण्यासाठी सामाजिक कार्यात सहभाग घेतलाच पाहिजे. परंतु त्याबरोबरच शासकीय सेवेत जाण्याच्या उद्देशाने स्पर्धा परिक्षांकडे लक्ष देऊन, परिवार, समाज, माता-पित्यांच्या नावलौकिकासाठी उच्चपदस्थ होणे गरजेचे आहे, असे मत माहेश्वरी पंच ट्रस्टचे कार्याध्यक्ष निलेश जाजू यांनी व्यक्त केले.
युवा महेश, संगमनेरच्यावतीने नवीन ५५ सभासदांचे स्वागत आणि विविध संस्थांवर पदभार स्विकारलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत यावेळी व्यासपिठावर माहेश्वरी समाजाचे सरपंच मदनलाल करवा, तालुकाध्यक्ष श्रीकांत मणियार, संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन श्रीगोपाल पडतानी, व्हाईस चेअरमन सतीश लाहोटी, शारदा पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिमा चांडक, व्हाईस चेअरमन सोनाली नावंदर, महेश पतसंस्थेचे चेअरमन योगेश जाजू, व्हाईस चेअरमन निलेश बाहेती, तसेच युवा महेशचे अध्यक्ष आशिष जाजू, उपाध्यक्ष विक्रम पडतानी, सचिव आनंद मणियार, सह-सचिव पवन नावंदर, खजिनदार राजेश जे.लाहोटी, सह-खजिनदार महेश कासट आदी उपस्थित होते.
जाजू म्हणाले, युवकांमध्ये सामाजिक कार्याबद्दल आत्मियता असते, ही चांगली बाब आहे. म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्ञान ग्रहण करण्याचे काम युवकांनी करावे. तात्पुरत्या खुर्चीच्या मोहात पडण्यापेक्षा उच्चपदस्थ होऊन खुर्चीवर कायमचे स्थान मिळवावे.
यावेळी विविध संस्थांवर नव्याने पदभार स्विकारलेले मान्यवर, नवनिर्वाचित ५५ सदस्य तसेच अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे मानद मंत्री अजय जाजू यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणीप्रसाद मुंदडा आणि आनंद मणियार यांनी केले. राजेश लाहोटी यांनी आभार मानले.