Breaking News

कुमार विश्वास यांनी मागितली माफी


नवी दिल्ली : भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात सोमवारी आपचे नेते कुमार विश्वास यांनीही बिनशर्त माफी मागितली. त्यांचा तो माफीनामा न्यायालयाने स्वीकारला असून त्यामुळे हा खटलाच निकाली निघाला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांनी अरुण जेटलींच्या विरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. जेटली 'दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे' (डीडीसीए) अध्यक्ष असताना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला, असा आरोप आपचे नेत वारंवार करत होते..