उजनी पाणीसाठा होणार वजा
सोलापूर, दि. 06, मे - संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. ती लवकरच मायनसमध्ये येणार आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी पातळी तब्बल 18 ते 20 टक्क्यांनी फायद्यात आहे. कारण गेल्या वर्षी हेच उजनी धरण 26 एप्रिललाच प्लसमधून मायनसमध्ये आले होते. मात्र, यावेळी पावसाळ्यात उशिरापर्यंत चाललेला पाऊस आणि पाटबंधारे विभाग व प्रशासनाने भीमा नदी व उजनी कालव्याद्वारे पाणी सोडण्यास केलेली चालढकल या कारणामुळेच उजनी धरणात गतवर्षीपेक्षा यावर्षी उजनी धरणात पाणीसाठा जास्त आहे.सध्या उजनी धरणात एकूण 73.14 टीएमसी पाणीसाठा असून त्यातील केवळ 9.48 टीएमसी पाणी उपयुक्त आहे, तर 63.66 टीएमसी पाणी हे अमृतसाठा आहे. उजनी धरण निर्मितीपासून आजतागायतपर्यंत दरवर्षी पाणीसाठा हा प्लसमधून मायनसमध्ये येतोच. 111 टक्के पाणीसाठा केवळ सहा महिन्यांत संपवला जातोच. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात उजनी प्लसमधून मायनसमध्ये पाणीसाठा येतोच. आतापर्यंत सर्वांत मायनसची निचांकी पातळी 2016 मध्ये गाठली होती ती मायनस 52.07 टक्के होती.
बाष्फीभवन एक मोठी समस्या उजनी धरणातील पाणीसाठा संपण्यासाठी जसे भीमा नदी, कालवा, बोगदा, उचलपाणी अशी कारणे अनेक आहेत, पण त्यात उजनीतील पाण्याचे बाष्पाीभवन हे एक मोठे कारण मानले जाते. कारण उजनी धरणाचे बॅकवाटरचे क्षेत्र हे सर्वात मोठे आहे. या पाणीसाठ्याचे 107 चौ. कि.मी. क्षेत्रफळ असून सध्या सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे तापमान भयंकर वाढले आहे. सध्या वेगाने बाष्फीभवन होत आहे.आतापर्यंत जवळपास 8 ते 9 टीएमसी पाणी हे बाष्पाीभवनाने संपले आहे.आणखी किती दिवस असे तापमान राहणार त्यावर उजनीचे पाणी किती जाणार हे आहे.