भंडारा, दि. 06, मे - नाना पटोलेंनी भाजपचा त्याग करून काँग्रेस प्रवेश केल्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी पटेल म्हणाले की, भाजप सरकारनी लोकहिताचे कामे केली नसल्याचे आरोप नाना पटोले यांनी केले होते व आपल्या खासदारकी पदाचा राजीनामा देत कांग्रेस मध्ये प्रवेश केला आहे, भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कांग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढत असून या संदर्भात आज दिल्लीला राहुल गांधी व शरद पवार यांच्यात बैठक आहे. मात्र भंडारा गोंदियाची जागा नेहमी राष्ट ्रवादीच्या कोट्यात राहिली असून ती आम्ही लढणारच अशी माहिती राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच नाना पटोले यांच्याशी काहीही मतभेद नाही आहेत त्या करिता आम्ही दोन्ही भाऊ भाऊ आहोत असेही पटेल बोलले तर भंडारा गोंदिया पोट निवडणूक मध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल, 9 तारखेला उमेदावर घोषित करणार असल्याचेही सांगितले तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या विषयी प्रश्न विचारले असता पटेलांनी सांगितले की, छगन बुजबळ याना जमीन मिळाच्याच आनंद आहे आणि भविष्यात ते निर्दोषही सुटतील अशी अपेक्षा आहे, मात्र त्यांना मुद्दाम जमीन मिळू न देण्यासाठी सरकार ने प्रयत्न केले आहे, तरीही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.