राज्यकर्त्यांना धडा शिकवा : खा. शेट्टी
पैठण : शेतकर्यांचा विश्वासघात करणार्या राज्यकर्त्यांना खाली खेचा , असे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केले. शेतकरी सन्मान अभियान दि. १ मे पासून धर्मा पाटलांच्या गावातून सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, की नोटबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आता जागे व्हावे आणि लढायला शिकायाला हवे. कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करायचे, असे या अभियानातून प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरी यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. प्रकाश पोपळे, पुजा मोरे, माणिकराव कदम, हंसराज वडगुळे, तालुकाध्यक्ष माऊली मुळे, बद्रीनाथ बोबंले, पवण शिसोदे आदी उपस्थिती होते.