Breaking News

नक्षल्यानी पेटवला ’एफडीसीएम’चा लाकूड डेपो


गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा इथल्या एफडीसीएम व मुख्य मार्गालगत असलेल्या लाकूड डेपोला रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी आग लावून लाकूड डेपो जाळून खाक के ले. यात वन विकास महामंडळाचे सुमारे 40 लाखाचे नुकसान झाले.

मूलचेरा तालुक्यातील जाळपोळीची ही दुसरी घटना असून गेल्या 8 मे रोजी मूलचेरा नजीक असलेल्या गट्टा येथे नक्षल्यांनी एफ.डी. सि. एम.च्या कामावर असलेले दोन ट्रक जाळले होते. तसेच नक्षल्यांनी पत्रके व बॅनर बांधले असून कसणासुर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी 25 मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. जाळपोळीमध्ये वन उपजक नाक्यावरील कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत.