Breaking News

निरवडेत पाच बंगले फोडले; चोरांचा धुमाकूळ सुरूच


सिंधुदुर्गनगरी - सावंतवाडी तालुक्यात चोराचा धुमाकूळ सुरूच आहे. तालुक्यात निरवडे इथल्या विष्णू सृष्टी मधले 5 बंगले फोडले. सर्व बंगल्यांचे मालक बाहेर गावी असल्याने एकूण किती ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय हे कळू शकले नाही. चोरीच्या वाढत्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.सावंतवाडी तालुक्यात निरवडे इथल्या विष्णूसृष्टी कॉलिनीमधले 5 बंगले चोरटयांंनी फोडून ग्रामस्थ आणि व्यावसाईक यांची झोपच उडवली आहे. हे चोरटे दरवाज्याची कुलुप तोडून घरात प्रवेश क रतात आणि घरातले समान विस्कटून मौल्यवान दागिने लंपास करतात अस दिसून आले आहे. 

चोरटयानी जे 5 बंगले फोडले त्या सर्व बंगल्याचे मालक बाहेर गावी किंवा अन्य ठिकाणी राहत असल्याचा फायदा उचलला आणि ही चोरी केली. कॉलनीतल्या मुबारक नाईक, सचिन नाईक, नंदिनी प्रभू, हेमन्त सोनवणे आणि योगेश प्रभू या पाच जणांचे बंगले याअज्ञात चोरटयानी फोडले, त्यामुळे या कॉलनीची सुरक्षा धोक्यात आली आहे. बांदा इथ चोरी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी निरवडे-सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात ही चोरी झाली. चोरीच्या या या वाढत्या घटनावर पोलीस प्रशासन कस नियंत्रण करणार ? असा सवाल इथले रहिवासी करत आहेत.
या कॉलनीत सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा मोठ्या हुशारीने चोरट्यांनी हात साफ केला आहे. जे बंगले बंद होते तेच फोडले. 

घटना मंगळवारी रात्री घडली असली तरी काही मालक परगावी असल्यान किती मुद्देमाल चोरीला गेलाय, हे समजू शकले नाही. मात्र सामान आणि फर्निचर, कपाट, दरवाजा फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही घरातून रोकड लंपास करण्यात आली आहे. मुबारक नाईक यांचे 20 हजार रुपये चोरीस गेल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. हे बंगले फोडण्यासाठी या चोरटयांनी कोयता, तसच लाकडी वस्तूचा वापर केला. कपाट फोडून कपडे विस्कटून टाकले. घरात सर्व सामान इतस्तत: पसरले होते.