Breaking News

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग बनला मूत्युचा रस्ता मोटारसायकल स्वाराचा मृत्यू

संगमनेर : प्रतिनिधी - प्रवाश्यांच्या सुविधेसाठी निर्माण केलेला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग मूत्युचा रस्ता बनलाय. या महामार्गावर दररोज अपघात घडुन लोकांना जीव गमवावे लागत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करुनही प्रशासन दाद देत नाही. काल रात्रीही अपघातग्रस्त गाडीला धडकुन कैलास अशोक पाटील ( वय 35 ) रा. शहापूर, अंमळनेर या मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे अपघातग्रस्त टेम्पोतील आंबे लुटण्याचा नागरीकांनी फायदा घेतला.


संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रात्री पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो रात्री 2.30 च्या दरम्यान उलटला, मात्र महामार्ग प्रशासनाने हा टेम्पो रस्त्यातून न काढल्याने पुण्याच्या दिशेने येणार्‍या वाहनाला तीव्र उतार व अचानक असलेले, वळण असल्याने या ठिकाणी पाठीमागून येणारे दोन टेम्पोही या उलटलेल्या वाहनास धडकले. तर एका दुचाकी स्वाराचाही या वाहनांना धडकून मृत्यू झाला. आज सकाळी या महामार्गावर झालेल्या अपघातामुळे नाशिककडे जाणार्‍या वाहनांची दोन तास महामार्गावर कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक लेन चालू केली, मात्र रस्त्यावर पडलेल्या आंब्यावर प्रवाश्यांनी आणि परीसरातील लोकांनी ताव मारला. या ठिकाणी प्रवाशांनी गोण्याच्या गोण्या भरून नेत अंदाजे 15 लाखांचा आंबा लुटुन नेला. या ठिकाणी तीव्र उतार असल्याने घाटात वाहनांचा स्पीड कमी करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.